FRESH BOOK TITLES IN THE SHOP

NEW ARRIVALS

Checkout Now!

Books

फिडे महिला ग्रँड प्रिक्स - पाचव्या चरणाच्या पहिल्या फेरीत दिव्याची विजयी सुरुवात

by Vivek Sohani - 15/04/2025

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात चालू असलेल्या फिडे महिला ग्रँड-प्री स्पर्धेच्या पहिल्या फेरीत मराठमोळ्या दिव्या देशमुखने विजयी सुरुवात करत चाहत्यांची वाहवा मिळवली. पहिल्या फेरीतील पाच पैकी चार सामने निकाली लागणे ही वैशिष्ठ्यपूर्ण बाब होती. ही स्पर्धा पुण्यातील अमानोरा फर्न येथे होत असून स्पर्धेत अजून ८ फेऱ्या बाकी आहेत.



फिडे महिला ग्रँड प्रिक्स २०२४-२५ च्या पाचव्या चरणाला उत्साहवर्धक सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत पाचपैकी चार डाव निकालात आले. भारताच्या आयएम दिव्या देशमुखने बल्गेरियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर नुर्ग्युल सालीमोव्हा हिच्यावर शानदार विजय मिळवला. सालीमोव्हा हिने एक्स्चेंज गमावल्यानंतर चुकीच्या पद्धतीने री-कॅप्चर केला आणि दिव्याने ती संधी योग्य प्रकारे साधून डाव जिंकला. भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशाली आणि ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. दुसरीकडे, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली हिची रक्षणात्मक शैली चीनच्या ग्रँडमास्टर झू जिनेर समोर चालली नाही आणि तिला पराभवाचा सामना करावा लागला. दि. १४ एप्रिल रोजी म्हणजेच स्पर्धेच्या पहिल्या दिवसी वाढदिवस साजरा करीत असलेल्या जॉर्जियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर मेलिया सालोमे हिला मंगोलियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर बत्खुयाग मुंगुंतुल हिच्याविरुद्ध कठीण पराभव स्वीकारावा लागला. सदर डाव सहज बरोबरीतही जाऊ शकला असता. दुसऱ्या फेरीच्या लढती आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणार आहेत.

नुर्ग्युल सालीमोव्हा - दिव्या देशमुख : 0-1

नुर्ग्युल सालीमोव्हा (रेटिंग 2402) आणि भारताच्या आयएम दिव्या देशमुख यांच्या डावातील क्षण | फोटो : फिडे

बल्गेरियाच्या आयएम नुर्ग्युल सालीमोव्हा (रेटिंग 2402) आणि भारताच्या आयएम दिव्या देशमुख (रेटिंग 2460) यांच्यात याआधी दोन वेळा क्लासिकल रेटेड लढती झाल्या होत्या आणि दोन्ही बरोबरीत सुटल्या होत्या. मात्र या वेळेस दिव्याने निर्णायक विजय मिळवला.

31...Ne4 नंतरची डावातील स्थिती

31...Ne4 ह्या डबल अटॅक मुळे पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या नुर्ग्युल हिला एक्सचेंज देणे भाग होते परंतु तो एवढा मोठा परिणामकारक नसल्याने अजूनही डाव बरोबरीतच होता.

परंतु. 32.Rxe4 dxe4 33.fxe4? नंतर दिव्याचे पारडे जड झाले. वास्तविक प्याद्या ऐवजी उंटाचा वापर करून जर री-कॅप्चर करणे अपेक्षित होते. दिव्याने लागलीच 33...f5 खेळत व्यवस्थित आघाडी घेतली आणि 34.Qe3 Rg4 35.Be1 Bxe4 36.Bxb5+ Kf7 37.g3 Bg5 नंतर मात्र पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या नुर्ग्युल हिला डावात मुसंडी मारणे शक्य झाले नाही.

बटखुयाग मुंगंटुल - मेलिया सलोम

बटखुयाग मुंगंटुल - मेलिया सलोम यांच्या डावातील क्षण | फोटो : फिडे

77.Bc8 नंतरची डावातील स्थिती

बटखुयाग मुंगंटुल हिला पहिल्या फेरीतील डाव जिंकताना खूपच कसरतींचा सामना करावा लागला. डावात अनेक चढ उतार आले आणि वेळच्या दबावाखाली खेळताना दोन्ही खेळाडूंकडून चुका होत गेल्या परंतु वरील पोझिशन मध्ये दाखवल्या प्रमाणे पांढऱ्या मोहोऱ्यांनी खेळणाऱ्या खेळाडूने Be6+ and g8Q, असा अतिशय भेदक मारा करण्याची तयारी दाखवल्याने काळ्याला g7-प्यादे मारण्याखेरीज पर्याय उरला नाही 77...Bxg7 78.Nxg7 नंतर Nc6! यामुळे a5-पॉन चा प्रष्ण संपला असता आणि डाव तात्पुरता तरी स्थिरावला असता. पण काळ्या ने 78...Kxg7?? चा निर्णय घेतला, ज्यामुळे पांढऱ्याला 79.Bb7 खेळून घोड्याच्या चालींवर मर्यादा घालता आल्या.

झू जिनेर आणि हरिका द्रोणावल्ली यांच्या डावातील क्षण | फोटो : फिडे

अलिना काश्लीन्स्काया आणि पोलिना शुवालोवा यांच्या डावातील क्षण | फोटो : फिडे

कोनेरू हम्पी आणि वैशाली आर. यांच्या डावातील क्षण | फोटो : फिडे

पहिल्या फेरी अखेर असलेली गुणतालिका :

आजच्या दुसऱ्या फेरीतील लढती :

१५.०४.२०२५ रोजी दुपारी ०३ : ०० वाजता सुरु होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील लढती वरील प्रमाणे

पहिल्या फेरीतील सर्व डाव :




Contact Us