फिडे रेटिंग म्हणजे नेमकं काय?

बुद्धिबळ खेळाची तोंड ओळख झाली आणि पहिली स्पर्धा खेळली की खेळाडू व पालकांच्या मनात घर करून बसतो तो प्रश्न म्हणजे "फिडे रेटिंग म्हणजे नेमकं काय?" ते कसं मिळवायचं ? आणि ते मिळाल्यावर त्याचे फायदे तोटे काय ? अश्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.
फिडे रेटिंग ही संकल्पना जाणून घेण्यापूर्वी मुळात फिडे म्हणजे काय आणि रेटिंग सिस्टीमचा इतिहासाची थोडक्यात माहिती करून घेणं गरजेचं आहे. "फिडे" (FIDE - Fédération Internationale des Échecs) ही संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आहे. हा संस्था संपूर्ण जगभरातील बुद्धिबळ खेळाचे नियमन करते आणि खेळाडूंची पात्रता, स्पर्धा, तसेच त्यांची रेटिंग प्रणाली ठरवते.